सल्लामसलत

  • नवीन रुग्णास डॉक्टरांचा पुरेसा वेळ दिला जाईल.
  • येताना आपल्या मुख्य वैद्यकीय माहितीची कागदपत्रे आणावी. इतर कोणते वैद्यकीय उपचार सुरू असल्यास अथवा मागील उपचारांची माहिती तसेच वैद्यकीय अहवालही आणावेत.  
  • आपण घेत असलेली कोणत्याही प्रकारची औषधे, जीवनसत्वे, वनौषधी किंवा इतर पूरक द्रव्यांची सूची तयार करा.
  • या औषधांच्या डोसचे प्रमाण आणि वेळा यांची नोंद करा.
  • डॉक्टरांना विचारण्याच्या तुमच्या प्रश्नांची सूची बनवा. सर्वात प्रथम महत्वाचे प्रश्न सूचीबद्ध करा.